Wakad : पुण्यात जन्मली दूध पिशवीहून कमी वजनाची चिमुरडी; भारतातील सगळ्यात कमी वजनाची मुलगी

एमपीसी न्यूज : 24 आठवडे म्हणजेच सहा महिन्यांत (Wakad) जन्मलेल्या चिमुरडीचे वजन फक्त 400 ग्रॅम होते. परंतु, सर्व संकटावर मात करत या मुलीने आता तिने साडेचार किलोचे वजन धारण केले आहे, तर भारतात जन्मलेली सर्वात कमी वजनाची मुलगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही मुलगी वाकड येथे राहणारी आहे. तर तिचे नाव शिवन्या आहे.    

शिवन्या हिने वाकडमध्ये सहा महिन्यातच जन्म घेतला. तिचे वजन 400 ग्राम म्हणजे एका दूध पिशवीहूनही कमी होते.  बाळाला पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. त्यानंतर तिचे जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. डॉक्टरांच्या पथकांनी मुलीचा जीव वाचवण्याचे काम सुरू केले आणि अखेर शिवन्याचा जीव वाचला. त्यांनी एक विक्रमच केला आहे.

गेल्या वर्षी जन्मलेल्या शिवन्याला 94 दिवस अतिदक्षता विभागात राहिल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा तिला घरी पाठवण्यात आले, तेव्हा तिचे वजन 2,130 ग्रॅम होते. अशा बाळांचा जगण्याचा दर 0.5% इतका कमी आहे. सामान्य 37-40 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर जन्मलेल्या बाळांचे वजन किमान 2,500 ग्रॅम असते.

Nigdi News : भक्ती-शक्ती उद्यानाचे सुशोभिकरण करा – सचिन चिखले

शिवन्याचे वडील म्हणाले, ‘ती आता इतर निरोगी नवजात मुलांसारखीच आहे. तिचे वजन 4.5 किलो आहे आणि ती जेवणही व्यवस्थित जेवते. तज्ज्ञांनी सांगितले, की, शिवन्याची तब्येत ही तिच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांचे फळ आहे. भारतात मुलींच्या नावावर कमी वजन असलेल्या जन्मानंतरही जिवंत राहण्याचा विक्रम आहे. डॉक्टरांनी सांगितले, की जेव्हा आपण गर्भधारणेचे वय आणि जन्माचे वजन जोडतो त्या संज्ञेत शिवन्या सर्वात लहान बाळ आहे. भारतात याआधी अशा प्रकारची अत्यंत परिपक्व जगण्याची कोणतीही घटना नोंदवण्यात (Wakad) आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.