Wakad : स्वयंपाक चांगला करत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – स्वयंपाक चांगला करता येत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पती दीनदयाल बावनकर, चुलत सासू शारदा बावनकर, सासरे बाबुलाल बावनकर, दीर हरीदयाल बावनकर, चुलत दीर धर्मेंद्र धांडूलाल बावनकर (सर्व रा. सालेटेका, हट्टा रोड, ता. किरणापूर, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून लग्नामधील हुंड्याची उर्वरित रक्कम घेऊन येण्यासाठी तसेच विवाहितेला स्वयंपाक चांगला करता येत नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत घरातून वेळोवेळी बाहेर हाकलून दिले. हाताने मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.