BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade  : जनावरांनी भुईमुगाचे पीक खाल्ले; विचारणा करणा-या वृद्ध महिलेला तिघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – शेतातील भुईमुगाचे पीक जनावरांनी खाल्ले. याबाबत शेतकरी महिलेने जनावरांच्या मालकांना याबाबात विचारणा केली. यावरून तिघांनी मिळून वृद्ध महिलेला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी अडीचच्या सुमारास चांदखेड गावात घडली.

श्रीकांत गायकवाड, शिवदत्त गायकवाड, चंद्रकांत गायकवाड या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या शेतात आरोपींची जनावरे आली. जनावरांनी महिलेच्या शेतातील भुईमुगाचे पीक खाल्ले. याबाबत महिलेने आरोपींकडे विचारणा केली. यावरून तिघांनी मिळून महिलेला शिवीगाळ करत हाताने व लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

.