Wakad : नोकरी अन् हजारो डॉलर्सचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – नोकरी लावण्याच्या बहाण्याने तसेच हजारो डॉलर्स खात्यावर पाठवल्याचे सांगत महिलेला साडेतीन लाखांचा गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर 2019 मध्ये वाकड येथे घडली. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजिता दत्तात्रय पुरी (वय 38, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 447438346159 आणि 9319365054 या क्रमांकावरून बोलणाऱ्या दोन जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 447438346159 या क्रमांकावरून संपर्क करून एका व्यक्तीने रंजिता यांना नोकरी लावण्याचे अमिश दाखवले. तसेच त्या व्यक्तीने रंजिता यांना 58 हजार डॉलर्स पाठवले असल्याचे सांगितले. डॉलर्सचे रुपयांमध्ये रूपांतर करून घेण्यासाठी 9319365054 या क्रमांकवरील एका महिलेने रंजिता यांना वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगितले.

फोनवरील दोघांनी मिळून रंजिता यांची 3 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.