Wakad : भांडण सोडविणाऱ्या तरुणावर शस्त्राने वार

एमपीसी न्यूज – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर एकाने धारदार शस्त्राने वार केले. तसेच हाताने आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कैलासनगर, थेरगाव येथे घडली.

मनोज हाटकर (रा. थेरगाव, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय ज्ञानदेव यादव (वय 30, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी मल (रा. थेरगाव) आणि त्याचे दोन भाचे (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हे त्यांचे मित्र मनोज आणि रोहन वाळके यांच्यासोबत त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी मनोज यांचे मेहुणे संतोष आणि युवराज गायकवाड यांना कैलासनगर थेरगाव येथे भांडणात मारहाण झाली असल्याचे समजले. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचे दोन मित्र घटनास्थळी गेले.

तिघेही भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आरोपींनी मनोज आणि त्यांच्या दोन मेहुण्यांना शिवीगाळ करत हाताने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यानंतर आरोपी रवी याने धारदार हत्याराने मनोज यांच्या गालावर वार केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.