Wakad: मावशीला अरे-तुरे म्हणणाऱ्या तरुणाला तिऱ्हाईत दारुड्याकडून मारहाण

Wakad: A young man was beaten by a drunkard

एमपीसी न्यूज- रस्त्याने जात असताना मावशीला अरे तुरे म्हटल्याने तिऱ्हाईत दारुड्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि.5) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील पडवळनगर येथे घडली.

अनिकेत अनिल पवार, आशिष अनिल पवार (दोघेही रा. पवारनगर, थेरगाव), शुभम धाकडे आणि आकाश वदक (दोघेही रा. पडवळनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आकाश अनिल जाधव (वय 23, रा. साईनाथ नगर, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी आकाश हे त्यांचा मित्र कुणाल पंडागळे याच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ते घरी साईनाथ नगर येथे जाण्यासाठी निघाले.

पडवळनगर थेरगाव येथील गणपती मंदिराजवळ आले असता ते त्यांच्या ओळखीच्या मावशीला अरे तुरे बोलत होते. याचा राग आल्याने तिथेच दारू पित बसलेल्या आरोपी अनिकेत याने आकाश यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.

तर उर्वरित तीन आरोपींना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.