Wakad : मुलांच्या खेळण्याचा त्रास होत असल्याचे पालकांना सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला सुऱ्याने मारहाण

एमपीसी न्यूज – लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा त्रास होत असल्याबाबत मुलांच्या पालकांना सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला पालकाने लोखंडी सु-याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2) दुपारी काळाखडक, वाकड येथे घडली.

मल्हारी मोतीराम लोंढे (वय 29, रा. काळाखडक, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत गिरमा जोगदंड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी यांची लहान मुले क्रिकेट खेळत होती. मुलांच्या क्रिकेट खेळण्याचा फिर्यादी लोंढे यांना त्रास होत होता. त्यामुळे लोंढे आरोपीला याबाबत सांगण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने लोंढे यांच्या डोक्यात लोखंडी सुरा मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.