Wakad : प्रादेशिक वादातून तरुणाला दारूच्या बाटलीने मारहाण

एमपीसी न्यूज – छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथील दोन मित्र एकाच खोलीत राहत असताना त्यांच्यात प्रादेशिक कारणावरून वाद झाला. यामध्ये छत्तीसगड येथील तरुणाला मध्यप्रदेश येथील तरुणाने दारूच्या बाटलीने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 7) पहाटे दोनच्या सुमारास ताथवडे येथे घडली.

विशाल संजय सिंग (वय 25, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रखर मलिक (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल आणि आरोपी प्रखर हे दोघे एकाच खोलीत राहतात. मंगळवारी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपी प्रखर याने विशाल याला ‘तू छत्तीसगड का है?, और मै मध्य प्रदेश का हूँ, तुम हमसे अलग बैठो’ असे म्हणून रूममध्ये पडलेली दारूची बाटली विशालच्या कपाळावर आणि हातावर मारली. यामध्ये विशाल जखमी झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.