Wakad : तपासणीच्या बहाण्याने महिलेचा गर्भपात; सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेकडे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यासाठी महिलेने नकार दिला. यावरून सासरच्या मंडळींनी महिलेचा वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने गर्भपात केला. याप्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डिसेंबर 2015 ते मे 2019 या कालावधीत वाकड येथे घडली.

प्रतिक सूर्यकांत कदम (वय 30), प्रणव सूर्यकांत कदम (वय 24), सुवर्णा सूर्यकांत कदम (वय 50) आणि सूर्यकांत कदम (वय 60) अशी गुन्हे दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि प्रतिक यांचा 2015 साली विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे वेळोवेळी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. ती विवाहितेकडून पूर्ण झाली नाही. यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शिवीगाळ व मारहाण करत छळ केला.

पती प्रतिक आणि सासू सुवर्णा यांनी विवाहितेचा वैद्यकीय तपासणीचा बहाणा करून गर्भपात केला. तर दीर प्रणव याने विवाहितेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल केला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.