Wakad : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला लातूर जिल्ह्यातून अटक; वाकड पोलिसांची कामगिरी

Absconding accused in Mocca case arrested from Latur district; Wakad police performance

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यात मागील दहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील हंगरगा येथून अटक केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार अनिकेत चौधरी याच्या गॅंगचा सदस्य आहे.

मोईज रब्बानी शेख (रा. आनंदवन हाऊसिंग सोसायटी, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 साली वाकड पोलीस ठाण्यात दरोड्याचा आणि मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपी शेख अद्याप फरार होता. वाकड पोलीस त्याच्या मागावर होते.

मागील दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी लातूर जिल्ह्यातील हंगरगा येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार वाकड पोलिसांचे एक पथक निलंगा तालुक्यातील हंगरगा येथे गेले. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी पोलिसांच्या मदतीने वाकड पोलिसांनी शिताफीने आरोपी शेख याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, नितीन गेंजगे, सुरज सुतार, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, शाम बाबा, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, सुरेश भोसले यांच्या पथकाने केली आहे.
औराद शहाजानी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू काळे यांनी या कारवाईमध्ये वाकड पोलिसांना मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.