Wakad Accident : चालकाचा ताबा सुटल्याने मुंबई-बंगळूर महामार्गालगतच्या खड्ड्यात बस कोसळली

एमपीसी न्यूज – मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाकड (Wakad Accident) येथे चालकाचा ताबा सुटल्याने उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून खासगी बस नदी पात्रालगत असलेल्या खड्ड्यात कोसळली. ही घटना आज पहाटे पाचच्या सुमारास  घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pune Crime News : खडकी, पुणे परिसरात दहशत पसरविणारा गुन्हेगार स्थानबध्द

एक खासगी बस मुंबई – बंगळूर महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने जात होती. वाकड येथे चालकचा ताबा सुटल्याने बस मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. बसचा वेग जास्त असल्याने बस बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या अपघातामुळे (Wakad Accident) महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दोन क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.