Wakad : विद्यार्थी घेऊन जाणा-या स्कुल व्हॅनची कचराकुंडीला धडक

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या स्कुल व्हॅनची कचराकुंडीला धडक बसल्याने मोठा अपघात झाला. व्हॅनमध्ये सात विद्यार्थी होते. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी साडेअकराच्या सुमारास डांगेचौक येथे घडली.

व्हॅनचालक प्रसन्नकुमार याकूब अरवडे (वय 51, रा. आदर्शनगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरवडे हा रहाटणी येथील महर्षी विद्या मंदिर या शाळेतील मुलांना सोडवण्यासाठी जात होता. दरम्यान, ताथवडे- डांगे चौक रस्त्यावर आल्यानंतर अरवडे याला रस्त्याचा अंदाज न आल्याने व्हॅन कचराकुंडीवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की महापालिकेची लोखंडी कचराकुंडी देखील काही फूट पुढे सरकली. या आवाजामुळे परिसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेत मुलांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी व्हॅनमध्ये एकूण सात मुले होती. पुढच्या सीटवर बसलेल्या मुलाच्या अगदी काही इंच अंतरापर्यंत व्हॅनचा पत्रा चिरला होता. यामध्ये किरकोळ जखमा वगळता कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.