_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Wakad : पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Accused arrested, who has been absconding for five months :आरोपी अनिकेत हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता.

एमपीसी न्यूज – विविध गुन्हे दाखल असलेला व पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्कातील गुन्हेगाराला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले.

अनिकेत अर्जुन चौधरी (वय.29, रा. प्रेरणा शाळेजवळ लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्याचे आदेश वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार शोध पथक आरोपीचा शोध घेत असताना आरोपी चौधरी याला हैद्राबाद येथील नकरेकल पोलीस स्टेशन येथे अटक केली असल्याची माहीती मिळाली.

या माहितीनुसार तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर व तपास पथकाचे कर्मचारी यांनी तात्काळ कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण केली व आरोपी अ चौधरी याला हैदराबाद येथील नालगोंडा जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतले.

तपास अधिकारी व वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी त्याला अटक केली असून दहा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप विष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम, विजय गंभीरे, दिपक भोसले, तात्या शिदे, शाम बाबा, संतोष शिदे, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.