Wakad : मोबाईल चोरी करणारा आरोपी वाकड पोलिसांकडून जेरबंद

Accused of mobile theft arrested by Wakad police

एमपीसी – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या इसमाच्या हातातून रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंगलाल श्रीनिवास भंग ( वय 30, रा.स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी ) हे दि. 10 जून रोजी 9.30 च्या सुमारास शुभम डेअरी, रहाटणी येथून पायी जात असताना काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी भंग यांच्या हातातील रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून नेला होता.

गुड्डू सलीम पठाण ( वय 22 वर्ष रा. चक्रापाणी वसाहत, गणराज कॉलनी, भोसरी ), असे अटक आरोपीचे नाव आहे. भंग यांच्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्हयाचा तपास करित असताना तपास पथकातील पोलिस हवालदार विभीषण कन्हेरकर व पोलिस नाईक सचिन नरुटे यांना  भंग यांचा मोबाईल गुंड पठाण याने साथीदाराच्या मदतीने नेल्याची माहीती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी पठाण याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने त्याचा विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने पल्सर मोटर सायकलवरुन फिर्यादी भंग यांचा रेड मी कंपनीचा मोबाईल हिसकावला असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे गुड्डू पठाण याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्हयातील चोरलेला 8000 रुपये किमंतीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली 60,000 रुपये किमंतीची पल्सर 220 ही मोटार सायकल जप्त करण्यात आली.

अटक आरोपी  पठाण याने हप्त्यावर यामाहा एफझेड दुचाकी विकत घेतली होती. लॉकडाऊनमध्ये आरोपीला हप्ते फेडणे शक्य न झाल्याने हप्ते फेडण्यासाठी विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी विभीषन कन्हेरकर, सचिन नरुटे, नितीन गेंगजे, शाम बाबा, बापुसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, तात्या शिंदे, नितीन ढोरजे, दिपक भोसले, जावेद पठाण, विक्रम कुदळ. विजय गंभीरे, जावेद पठाण, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले सुरेश भोसले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like