Wakad : गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने अटक केली. आरोपीने एक महिन्यापूर्वी वाकड परिसरात गंभीर दुखापतीचा एक गुन्हा केला होता.

पंकज रतन पाचपिंडे (वय 26, रा. गुरुनानक कॉलनी थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी दरोडाविरोधी पथक वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक आशिष बोटके आणि निशांत काळे यांना माहिती मिळाली की, मागील काही दिवसांपूर्वी काळेवाडी फाटा येथील रिक्षा स्टँडवर भांडणे झाली होती. त्या भांडणातील एकजण गोडांबे चौक येथे थांबलेला आहे. तो कोणाची तरी वाट पाहत आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून पंकज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेला एक गंभीर दुखापतीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी महेश खांडे, आशिष बोटके, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने केली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like