Wakad : दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक

Accused of trying to steal a bike arrested :दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याला अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास नखातेनगर, रहाटणी फाटा येथे घडली.

सनी प्रकाश गायकवाड (वय 35, रा. तपकीरनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विनयकुमार विजयकुमार देशमुख (वय 30, रा. नखातेनगर, रहाटणी फाटा, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांनी त्यांची दुचाकी (एमएच 14 / ईबी 9020) त्यांच्या घरासमोर रस्त्याच्या बाजूला बुधवारी (दि. 1) रात्री साडेअकरा वाजता पार्क केली होती.

गुरुवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास आरोपी सनी गायकवाड याने फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

दुचाकी चोरी करताना फिर्यादी यांनी आरोपी सनी याला पकडले. त्यानंतर सनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.