Wakad : भारतीय किसान संघाच्या “इर्जिक” उपक्रमास अतिरिक्त आयुक्तांनी दिली भेट

Wakad: Additional Commissioner visits "Irgic" initiative of Bhartiya Kisan Sangh

एमपीसी न्यूज -भारतीय किसान संघाच्या “इर्जिक” उपक्रमाअंतर्गत हौसिंग सोसायटी मध्ये शेतकऱ्यांकडुन फळे व भाजीपाल विक्रीसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी भेट दिली.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांच्या सोयी करिता भारतीय किसान संघाच्या माध्यमातून “इर्जिक” उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत शहराच्या विविध भागातील 104 हौसिंग सोसायटी मध्ये शेतकऱ्यांकडुन फळे व भाजीपाल विक्रीसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या सोसायटी मध्येच थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी रविवारी (दि.31) मे रोजी वाकड येथील एका सोसायटी मधील ‘इर्जिक’च्या भाजीपाला विक्री केंद्रास भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली.  यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘इर्जिक’ च्या माध्यमातून शहरात सुरू असलेला हा अनोखा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. शहरातील अधिकाधिक नगरिकांना या सुविधेचा लाभ व्हावा या करिता  आगामी काळात ‘इर्जिक’ विक्री केंद्रांची संख्या  वाढवण्यासाठी पालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आकुर्डी गटाचे संघचालक राजेश भुजबळ, रा. स्व. संघ जनकल्याण समिती जिल्हा कार्यवाह उदय कुलकर्णी, इर्जिक चे जिल्हा संयोजक विलास कुटे, रा.स्व. संघाचे पिंपरी चिंचवड वस्ती रचना प्रमुख शैलेश कुलकर्णी तसेच पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन चे केसी गर्ग उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.