Wakad: कौतुकास्पद ! वाढदिवसाचा खर्च टाळून गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जग अस्ताव्यस्त झाले आहे.अनेकांच्या हाताला कामे नाहीत, हातावर पोट असणाऱ्या घरांत आर्थिक विवंचना भासत असून संसाराची घडी विस्कटलेली पाहायला मिळत आहे. संचारबंदीच्या काळात त्यांचीही चूल पेटावी या हेतूने एका पंधरा वर्षाच्या मुलाने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून समाजातील हातावर पोट असणाऱ्या 100 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले.

सम्यक सतीश वाघमारे असे या तरुणाचे नाव आहे. समाजाचे आपण काही तरी देणे असतो म्हणून वाकड येथील पंधरा वर्षाचा असणारा सम्यक वाघमारे याने आपल्या साधून वाढदिवसाचा होणारा अनर्थ खर्च टाळला. समाजातील निराधार व गरजू अशा 100 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सम्यकचे वडील सतिश वाघमारे, पुरुषोत्तम वाघमारे, निलेश वाघमारे, स्वप्निल वाघमारे उपस्थित घेतले.

सम्यकने वाढदिवसानिमित्त अनर्थ खर्च टाळून त्याने दिलेला मदतीचा हात समाजात प्रेरणा देणारा आहे. मदतीमुळे सर्व कुटुंबियांनी सम्यकचे आभार मानले. सामाजिक भान जपत वाढदिवसाचा खर्च टाळून गोरगरिबांना मदत केल्याने सम्यकचे परिसरात कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.