Wakad: हॉटेलसमोर कार पार्क केल्याने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण; कारची केली तोडफोड

एमपीसी न्यूज – हॉटेलसमोर कार पार्क केल्याने हॉटेल मालक आणि कामगारांनी दोघांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच कारच्या काचा फोडल्या, सोनसाखळी तोडून गहाळ केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24)वाकड येथे रात्री दीडच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ओंकार पांडुरंग पाटील (वय 27, रा. पिंपळे सौदागर)याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिवॉर्ड हॉटेलचे मालक आणि त्यांच्या तीन कामगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी ओंकार आणि त्याचा मित्र अझर हे दोघे शुक्रवारी वाकड येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. बिलाचे पैसे देण्यासाठी एटीएममधून पैसे काढून त्यांनी लिवॉर्ड हॉटेलसमोर त्यांची पोलो कार पार्क केली. त्यावरुन हॉटेल मालक आणि कामगारांनी ओंकार याच्या उजव्या हातावर लोखंडी रॉडने, पाठीवर काठीने मारहाण केली.

तर, त्याचा मित्र अझर याच्या डोक्यात रॉड मारला. शिवीगाळ करत कारची काच फोडली. ओंकार याची दिड तोळ्याची सोनसाखळी गहाळ केली, असे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.