Wakad : अजित पवार यांनी साधला वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीमधील रहिवाशांशी संवाद

एमपीसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीमधील रहिवाशांसोबत जनसंवाद सभा घेतली. या सभेला पार्क स्ट्रीटमधील आणि वूडस सोसायटीमधील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

यावेळी रहिवाशांनी अजित पवार यांच्याशी त्यांच्यासमोर विविध प्रश्न व समस्या तेथील रहिवाशांनी मांडल्या, यावेळी अजित पवार म्हणाले, “सर्व समस्यांची योग्य ती दखल घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रथमच आमच्या समस्या एका प्रशासनावर पकड असलेल्या कार्यक्षम नेत्यांनी ऐकल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. पार्थ पवार यांना विजयी करण्यासाठी पार्क स्ट्रीटमधील रहिवाशांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, डब्बू आसवानी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.