Wakad: गहूंजेतील सरपंच पत्नीचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – अनैतिक संबंधांबाबत पतीकडे विचारणा करणा-या गहूंजे गावच्या महिला सरपंचाचा पतीने गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाकड येथे घडली.

शीतल किरण बोडके (वय 28, रा. पाम अव्हेन्यू सोसायटी, भुमकर चौक, वाकड) असे खूनाचा प्रयत्न झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. तिचा पती किरण निर्गुण बोडके (वय 38 ) याला वाकड पोलीसांनी गजाआड केले आहे. बोडके कुटुंबीय मूळचे मावळ तालुक्यातील गहूंजे गावचे आहे.

  • शीतल या गहुंजे गावच्या सरपंच आहेत. त्यांचे पती किरण याचे बाहेरील स्त्रीयांशी अनैतिक संबंध आहेत. याचा जाब विचारल्याच्या कारणावरून डिसेंबर 2016 पासून किरण पत्नी शीतल यांना सतत मारहाण करून त्रास देत असे. तसेच वडीलांकडून दोन कोटी रूपये आण, असा तगादाही त्याने लावला होता.

19 जून रोजी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी किरणने शीतलला ‘तुला मारूनच टाकतो, असे म्हणत गळा दाबून पत्नी शितल हिचा खून करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. वाकड ठाण्याचे फौजदार ए. बी. हिंगोले अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.