-MPC-TOP-MOST-BANNER-I

Wakad : रहाटणीत वृद्धाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – रहाटणी येथे इमारतीच्या 13व्या मजल्यावरून उडी मारून एका वृद्धाने आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. 23) दुपारी घडली.

सुनील रानडे (वय 65) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रानडे यांना रहाटणी येथे फ्लॅट खरेदी करायचा होता. शिवाजी चौकाकडून शिवार चौकाकडे जाणा-या रस्त्यावर असलेल्या एका इमारतीमध्ये तेराव्या मजल्यावर त्यांनी फ्लॅट बघितला होता. पुन्हा तो फ्लॅट पाहण्यासाठी रानडे त्या इमारतीमध्ये आले होते.

दरम्यान, रानडे यांनी सेल्सच्या प्रतिनिधीला ‘माझा मुलगा येणार आहे. तो आल्यानंतर निर्णय कळवतो’ असे सांगितले. त्यामुळे सेल्स प्रतिनिधी फ्लॅटमधून त्याच्या कामासाठी गेला. त्यानंतर रानडे यांनी तेराव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रानडे यांनी उडी मारून आत्महत्या केली असली तरी त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.