Wakad : फ्रिज विकत घेण्याच्या बहाण्याने महिलेला 50 हजारांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज – घरातील फ्रीज विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. त्याद्वारे अज्ञाताने फ्रीज घेण्याचा बहाणा करून महिलेला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले. त्याआधारे महिलेच्या बँक खात्यातून सुमारे 49 हजार 986 रुपये काढून घेतले. ही घटना सुकासा सोसायटी, वाकड येथे घडली.

अंजली श्रीकांत अहिरराव (वय 52, रा. सुकासा सोसायटी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7636868941 मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी एक ते चार या कालावधीत ही घटना घडली. अंजली यांनी त्यांच्या घरातील जुना फ्रीज विकण्याची ओएलएक्स या संकेतस्थळावर जाहिरात दिली. ही जाहिरात पाहून अज्ञात आरोपीने 7636868941 या क्रमांकावरून अंजली यांना फोन केला. अंजली यांचा फ्रीज आपल्याला घ्यायचा आहे. त्याचे पैसे ऑनलाईन देतो, असे अंजली यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने अंजली यांच्या मोबाईलवर एक क्युअर कोड पाठवला. हा कोड स्कॅन केल्यास त्यांना पैसे मिळणार असल्याचे सांगितले. तसेच अंजली यांच्या मोबाईल फोनवर एक लिंक पाठवून त्यावर क्लीक करण्यास सांगून त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यामधून 49 हजार 986 रुपये काढून घेत अंजली यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.