Wakad: …अन् दहा रूपयांची नेलपेंट पडले महागात!

एमपीसी न्यूज – ‘नायका’ या संकेतस्थळावरून मागविलेली नेलपेंट न आल्याने तरूणीने एकाला मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली. तिच्या बँक खात्याची माहिती विचारून आरोपीने खात्यावरून सुमारे 92 हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्यामुळे दहा रुपयांची नेलपेंट तरुणीला जवळपास लाख महागात पडली आहे. ही घटना वाकड येथे नुकतीच उघडकीस आली.

याप्रकरणी पायल प्रदीप त्रिवेदी (वय 25, रा. काळेवाडी) हिने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाकीर अली कायाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पायलने ‘नायका’ या संकेतस्थळावरून एक निलपेंट बुक केली होती. नेलपेंट न आल्याने तिने आरोपी कायाल याच्याशी या 9875363873 मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली. आरोपीने पायलच्या बँक खात्याची माहिती विचारून एचडीएफसी, एसबीआय बँकेच्या खात्यावरून 92 हजार 446 रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोगम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.