Wakad : तरुणाकडून दीड लाखांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – एका 27 वर्षीय तरुणाकडून 1 लाख 66 हजार रुपये किमतीचा 11 किलो 42 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड येथे केली.

गोपाळ संजय माळी (वय 27, रा. गल्ली नंबर एक, हुडकू, शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे यांना माहिती मिळाली की, एक तरुण एका पोत्यात गांजा घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी वाकड मधील भूमकर चौकाकडे जाणा-या रोडवर डेअरी फार्म गेट नंबर दोनच्या समोर एक तरुण पांढरे पोते घेऊन जाताना दिसला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ असलेल्या पोत्यामध्ये 1 लाख 66 हजार रुपये किमतीचा 11 किलो 42 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. त्यावरून त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांकडे देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, प्रशांत महाले, पोलीस कर्मचारी प्रदीप शेलार, राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, रमेश भिसे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर, अशोक गारगोटे, पांडुरंग फुंदे, बाळासाहेब दौंडकर, तुकाराम घुगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.