BNR-HDR-TOP-Mobile

Wakad: पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलले

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेला पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्ड बदलले. एटीएम कार्ड बदलण्यापूर्वी आरोपीने महिलेकडून गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे एटीएममधून साडेसात हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार डांगे चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये 13 फेब्रुवारी रोजी घडली.

रेखा विजय पाखरे (वय 41, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी रोजी फिर्यादी रेखा डांगे चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. त्यांच्या खात्यामधून पैसे निघत नसल्याने त्यांच्या शेजारी असलेल्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देण्याचे आमिष दाखवले. त्याने एटीएम कार्ड स्वाईप करून गोपनीय माहिती घेतली आणि पैसे निघत नसल्याचे दाखवून हातचलाखी करून दुसरे एटीएम कार्ड रेखा यांना दिले.

त्यानंतर आरोपीने रेखा यांच्या एटीएम कार्ड वरून साडेसात हजार रुपये काढून रेखा यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.