Wakad : बाथरूमचा दरवाजा तोडल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी बाथरूमचा दरवाजा तोडण्यावरून दोन जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री साडेआठच्या सुमारास कस्पटेवस्ती वाकड येथे घडली.

भूषण उत्तम सुरवसे (वय 22 रा. पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल विद्यासागर सुरवसे, पवन गायकवाड (दोघे रा. पिंपळे गुरव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण आणि त्यांचा भाऊ शुभम यांची आरोपींसोबत मागील दोन दिवसांपूर्वी बाथरूमचा दरवाजा तोडल्या वरून भांडण झाले. आरोपींनी भूषण यांचा भाऊ शुभम सुरवसे याला मारहाण केली. तसेच डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.