Wakad : बिअरच्या बाटलीने तरुणाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बिअरच्या बाटली आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास ताथवडे येथे घडली.

अमर अरुण राठोड (वय 21, रा. वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखिल शेवाळे, कृष्णा आरण, राजू कांबळे, दाद्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी यांच्या मित्राचे भांडण सुरु होते. त्या भांडणाच्या कारणावरून कार (एम एच 14 / एफ बी 7774) मधून आलेल्या चार आरोपींनी फिर्यादी यांना बिअरच्या बाटली आणि दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.