Wakad : बेकरी कामगाराला चाकूने वार करीत लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या बेकरी कामगारावर दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरटयांनी चाकूने सपासप वार केले. तसेच त्यांच्या खिशातील एक हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊच्या सुमारास थेरगाव येथील पंडित पेट्रोल पंपाच्या मागे घडली.

भैय्यालाल मुन्शीलाल पासवान (वय 33, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पासवान हे वाकड येथील इंडियन बेकरीमध्ये काम करतात. रविवारी रात्री ते एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरटयांनी त्यांना दुचाकी आडवी लावली. एका आरोपीने त्यांच्या पोटाला चाकू लावला. चाकूच्या धाकाने पासवान यांना पंडित पेट्रोल पंपाच्या मागील मोकळ्या मैदानात नेले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील एक हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला. पैसे आणि मोबाईल काढून घेतल्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातावर, डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये पासवान जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.