Wakad : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून मोठ्या भावाकडून चाकूने वार

एमपीसी न्यूज – लहान भावाने मोठ्या भावाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या रागातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री सातच्या सुमारास शिवराजनगर रहाटणी येथे घडली.

उत्पल जनार्दन गाडे (वय 37, रा. शिवराजनगर, रहाटणी) असे जखमी भावाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उमेश जनार्दन गाडे (वय 40) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्पल यांनी त्यांचा मोठा भाऊ आरोपी उमेश याच्याविरोधात मागील काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री उत्पल स्वयंपाक घरात काम करत असताना उमेश याने त्यांच्यावरच्या चाकूने हल्ला केला.

यामध्ये उत्पल यांच्या डोक्याला, कमरेवर गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.