Wakad : वाकड आणि चाकण मधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड आणि चाकण परिसरातून 36 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तिपन्ना बाळासाहेब जाधव (वय 25, रा. गहुंजे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास जाधव यांनी त्यांची 16 हजार रुपये किमतीची दुचाकी ताथवडे येथील सिल्वर फिटनेस क्लब समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

विकास गंगाधर तांगडे (वय 33, रा. चक्रेश्वर मंदिर रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. 1) दुपारी पाचच्या सुमारास तांगडे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 23 / ए एच 3485 ही दुचाकी चक्रेश्वर मंदिर रोड वरील कांची सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्याने तांगडे यांची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like