BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : भरदिवसा घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 3 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना माउली चौक वाकड येथे सोमवारी (दि. 22) घडली.

अक्षय रवींद्र मिश्रा (वय 30, रा. माउली चौक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय वाकड येथे खाजगी कंपनीत नोकरी करतात. ते सकाळी साडेआठच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले. दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि लॅपटॉप असा एकूण 3 लाख 4 हजार रुपयांचा माल चोरून नेला. सायंकाळी सहा वाजता अक्षय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.