Wakad : मोबाईलचे दुकान फोडून पावणेचार लाखांचे 33 मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल पावणेचार लाखांचे 33 मोबाईल फोन चोरले. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

दुकान मालक हेमराज जेसराम कुमावत (वय 26, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराज यांचे थेरगाव येथे ममता मोबाईल अॅन्ड इलेक्‍ट्रॉनीक्‍स हे दुकान आहे. बुधवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील सिमेंटचा पत्रा तोडून त्याद्वारे दुकानात प्रवेश केला. दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे 3 लाख 76 हजार रुपये किमतीचे 33 माबईल व 2 हजार रुपयांचा डिव्हीआर असा एकूण 3 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.