Wakad : घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 84 हजार 381 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (दि. 26) सकाळी सहाच्या दरम्यान डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

रोहीत नंदकिशोर कोडग (वय 29, रा. वाकड, मूळ रा. किरणगी, ता. अटणी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोडग काम करीत असलेले ऑफिस बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास कुलूप लावून बंद केले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातून सुमारे 83 हजार 381 रुपयांची रोकड आणि एक हजार रुपयांचे कापड असा एकूण 84 हजार 381 रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.