Wakad : घरफोडी करून 70 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 70 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.

संदीप सूर्यकांत पाटील (वय 30, रा. कुणाल रेसिडन्सी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 9) सायंकाळी साडेसात ते रविवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान फिर्यादी पाटील यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून लाकडी कपाटातून 27 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.