Wakad : गांजा सेवन करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : काळेवाडी येथे (Wakad) गांजा सेवन करणाऱ्यास अटक करून त्याच्याकडून सामग्री जप्त करण्यात आली आहे. महेंद्र मोरे (वय 28 वर्षे, रा. काळेवाडी मूळ गाव टले, जि. रत्नागिरी) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात एन.डी.पी.सी ऍक्ट कलम 8(क) 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon maval : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रंगला मैत्रिचा रौप्यमहोत्सव

आरोपी हा बुधवार 30 नोव्हेंबर रोजी 11.30 वाजता आशीर्वाद स्टोअर्सच्या मागे शंकर मंदिराशेजारी काळेवाडी येथे गांजा या मादक अमली पदार्थाचे सेवन करताना त्याच्या ताब्यात दोन चिलीम, हिरव्या रंगाचे पाणी फुले असलेला पाल्याचे दोन पिशव्या मिळाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.