Wakad : परताव्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणाची सुमारे तीन लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मे 2019 ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान रहाटणी येथे घडला. याप्रकरणी 27 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रिजबिहारी अनिल जयस्वाल (वय 23, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दयाभाई मडरूपभाई कुंभार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंभार याने फिर्यादी जयस्वाल यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवले.

त्यानुसार जयस्वाल आणि त्यांच्या मित्राने मिळून 3 लाख 60 हजार रुपये कुंभार यांच्याकडे दिले. त्यानंतर कुंभार याने परतावा व पैसे माघारी देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.