Wakad : तलाक देण्यासाठी दबाव आणणा-या आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेला तलाक देण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2016 ते 4 सप्टेंबर 2019 या कालावधीत वाकड आणि बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडली.

पती ऐत्तशाम इप्तेखार सय्यद (वय 26), सासू सगेरा इफ्तेखार सय्यद (वय 40), सासरे इफ्तेखार अहमद सय्यद (वय 50), दीर जुनेद इप्तेखार सय्यद (वय 25), नणंद तबस्सून नजीर (वय 30, सर्व रा. नेकनूर, जि. बीड), नंदावा नजीर शेख (वय 35, रा. ढकलगाव, जि. जालना)चुलत सासरे जाकेर अहमद सय्यद (वय 51, रा. नेकनूर), नणंद हिना सगीर शेख (रा. अंबाजोगाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे दुस-या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यासाठी सासरचे मंडळी महिलेला घटस्फोट देण्यासाठी प्रवृत्त करीत होते. त्यावरून तिला शिवीगाळ करून मारहाण देखील करत होते. याबाबत फिर्यादी महिलेने नेकनूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवली. ही तक्रार मागे घेण्यासाठी सर्व आरोपी तिला फोनवरून धमकी देत होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.