Wakad : पार्किंगमध्ये घुसखोरी करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पार्किंगमध्ये घुसखोरी करून वाहन पार्क करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रहाटणी येथे घडली.

अशोक बाळासाहेब अनारसे (वय 33) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनेश जगदेव (वय 38, रा. प्राइम होम्स, रहाटणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट ते 23 ऑक्‍टोबर या कालावधीत जगदेव यांनी प्राइम होम्सच्या 14 क्रमांकाच्या पार्किंगमध्ये अतिक्रमण करून आपली मोटार पार्क केली. याबाबत विचारणा केली असता दिनेश याने अनारसे यांना शिवीगाळ करून ‘तुला काय करायचे ते करून घे. तू माझ्या नादी लागला तर तुला बघून घेईन’, अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोळवे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.