Wakad: संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार, कंपनीतील सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Computer engineer young woman raped पीडित 29 वर्षीय तरुणी आणि आरोपी हे दोघेही संगणक अभियंता असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकाच कंपनीत नोकरीला आहेत.

एमपीसी न्यूज –  एकाच कंपनीत कामाला असताना झालेल्या प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष दाखवत संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी संगणक अभियंता तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे घडली.

अभिलाष अंबरनाथ शिवनगर (वय 27, रा. सेवादलनगर, नागपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. 29  वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 21 सप्टेंबर 2019 ते 22 मार्च 2020 दरम्यान घडली.

पीडित 29 वर्षीय तरुणी आणि आरोपी अभिलाष हे दोघेही संगणक अभियंता असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकाच कंपनीत नोकरीला आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. अभिलाष याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.

तसेच महाबळेश्वर येथील लॉजवर तसेच वाकड येथे ठिकठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. यानंतर तरुणीने अभिलाष याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच परत फोन करु नको, अशी धमकी दिली. यावर पीडितेने वाकड पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

फौजदार विकास मडके तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.