Wakad : बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- बांधकामावरील 15 लाख 50 हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या सुरक्षारक्षक व सुरक्षारक्षक एजन्सीचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे घडली.

सुरक्षारक्षक पृथ्वीराज सोनू आणि सुरक्षारक्षक एजन्सीचे मालक अजय वर्मा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मुकुंद वसंत खटावकर (वय 42, रा. आंबेगाव, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 8) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या वाकड येथील बांधकाम साईटवरून 15 लाख 50 हजार रुपयांचे ऍल्यूमिनियम पॅनेल चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक साबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.