Wakad : बीआरटीएस कॉरीडॉरमध्ये विद्युत कामांसाठी सल्लागार

एमपीसी न्यूज – बीआरटीएस कॉरीडॉरअंतर्गत देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडी हद्दीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येत आहे. या रस्त्यात विविध विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नव्याने विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता वैष्णवी कन्सल्टंट यांना महापालिकेने पत्राद्वारे विचारणा केली. 13 मे रोजी त्यांनी काम करण्याची तयारी दर्शविली. या कार्यालयाअंतर्गत सध्या नवीन रस्त्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण करण्याची दहा कामे सुरू आहेत. तर, 20 कामे प्रस्तावित आहेत.

सध्या बीआरटी स्थापत्य विभागामार्फत बीआरटीएस कॉरीडॉर अंतर्गत वाकड येथील देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावरील पुलापासून हिंजवडी हद्दीपर्यंतचा रस्ता विकसित करण्याच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. वैष्णवी कन्सल्टंट यांनी पूर्वी स्थापत्य व विद्युतच्या एकत्रित कामासाठी इन्फ्रा किंग यांच्यासमवेत विद्युत विषयक कामासाठी सल्लागार म्हणून काम केल्याचे पत्र सादर केले आहे. त्यामुळे विद्युत विषयक कामासाठी वैष्णवी कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सल्लागार नामिका सूचीमध्ये वैष्णवी कन्सल्टंट यांचा समावेश आहे. त्याकरिता त्यांना नियमानुसार शुल्क देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.