Wakad : वस्तूंचे भाव समान ठेवण्यावरून दोन किराणा दुकानदारांमध्ये वाद

एमपीसी न्यूज – मालाचा समान भाव ठेवण्याबाबत सांगणाऱ्या किराणा दुकानदार महिलेला कमी दरात किराणा मालाची विक्री करणाऱ्या दुकानदाराने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी सातच्या सुमारास ताथवडे रोड वाकड येथे घडली.

प्रेमीदेवी ओमप्रकाश जाट (वय 40, रा. सिल्वर जिम, कोईनूर साईड, ताथवडे रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुलाराम उटनाराम देवर्षी (वय 28) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाट आणि आरोपी देवर्षी यांचे किराणा मालाचे दुकान शेजारी-शेजारी आहे. आरोपी देवर्षी हा कमी भावात मालाची विक्री करतो. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला मालाचा एक भाव ठेव असे सांगितले. यावरून चिडलेल्या आरोपीने जाट यांना हाताने तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये जात यांच्या हातावर, पाठीवर, पायावर गंभीर इजा झाली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.