Wakad : पाण्याच्या टँकरने सायकलस्वाराला चिरडले

टँकर चालकाविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याने सायकलवरून जात असलेल्या इसमाला भरधाव वेगात आलेल्या पाण्याच्या टँकरने चिरडले. यामध्ये सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेसातच्या सुमारास पोलारीस हॉस्पिटल समोर वाकड येथे घडली.

विजय अमागल दास (वय 57) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संजय लालू दास (वय 22, रा. वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलारीस हॉस्पिटलसमोर वाकड येथून सायकलवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या पाण्याच्या टँकरने (एमएच 12 / एचडी 6477) त्यांना जोरदार धडक दिली.

यामध्ये विजय टँकरच्या चाकाखाली आले. टँकरचे चाक त्यांच्या पोटावरून गेले. या अपघातात विजय गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल केला असून वाकड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.