Wakad Crime : दत्तभक्ताला जबरदस्तीने मटण खायला घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दत्तभक्त असलेल्या एका व्यक्तीला जबरदस्तीने मटण खाऊ घालणा-या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मटण खाण्यास विरोध केल्यानंतर आरोपीने दत्तभक्त असलेल्या व्यक्तीला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 18) रात्री अकरा वाजताच्या सुमारास काळेवाडी गावठाण, वाकड येथे घडली.

बबन (पूर्ण नाव माहिती नाही, रा. काळेवाडी गावठाण, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नागेश शिवाजी कदम (वय 48, रा. काळेवाडी गावठाण, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकरा वाजता आरोपी बबन फिर्यादी कदम यांना म्हणाला की, चल जेवायला. मटणाची भाजी केली आहे.’ यावर फिर्यादी कदम आरोपीला म्हणाले, मी गुरुदेव दत्ताचा भक्त आहे. मी मटण खात नाही.

_MPC_DIR_MPU_II

याचा आरोपीला राग आला. त्याने फिर्यादी कदम यांना शिवीगाळ करून धक्काबुकी केली. कदम यांनी आरोपीला प्रतिकार केला असता आरोपीने कदम यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये कदम यांच्या हातावर, चेह-यावर गंभीर दुखापत झाली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.