Wakad Crime : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – अनधिकृतपणे बांधकाम केल्यामुळे पालिकेने याबाबत नोटीस देऊनही बांधकाम काढले नसल्याने महापालिकेकडून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ दादाराव माखले (रा. बीआरटी रोड, आदर्शनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप अभियंता नितीन रामचंद्र निंबाळकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बीआरटी रोड, आदर्शनगर, काळेवाडी येथील घराचे बांधकाम अनधिकृतपणे केले. याबाबत महापालिकेकडून माखले यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर देखील माखले यांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही.

याबाबत माखले यांच्या विरोधात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 478 (1), 433, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम कलम 397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.