Wakad Crime : तरुणीला गरोदर करत तिच्याशी लग्नाला नकार देणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – स्वतःचे लग्न (Wakad Crime) झालेले असतानाही तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गरोदर केले व तिच्याशी लग्न करण्यास नकार देणाऱ्या इसमाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार 20 ऑक्टोबर 2020 ते आजपर्यंत रहाटणी, भुगाव व पिंपळे गुरव या परिसरात झाला.

याप्रकरणी 29 वर्षीय पीडितेन वाकड पोलीसात शुक्रवारी (दि.30) फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी नविन लक्ष्मण बहादुर (वय 40 रा. पिंपळे गुरव) याला अटक केले आहे.

Dehugaon Crime : पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पती गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न झालेले असताना देखील त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. पीडिता यामध्ये गरोदर राहिली, (Wakad Crime) तिला मुलगीही झाली. यावेळी मात्र आरोपीने लग्नास नकार देत पीडिता व तिच्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढिल तपास वाकड पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.