Wakad Crime : ताथवडे येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – ताथवडे येथे लाईगुडे कॉम्प्लेक्समध्ये असलेले एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे सव्वातीन वाजता घडली आहे.

धर्मराज देशराज यादव (वय 46, रा. तोफखाना रोड, शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथे जे एस. पी. एम. कॉलेजजवळ लाईगुडे कॉम्प्लेक्समध्ये एटीएम सेंटर आहे. मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजता अज्ञात चोरट्यांनी एटीएम च्या लॉकरवरील लोखंडी दरवाजा तोडला. मशीनच्या आतील लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चोरट्यांना आतील लॉकर तोडता आले नाही. यामध्ये मशीनचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.