Wakad Crime : दक्षतानगर मध्ये 50 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – गावी गेल्यानंतर बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दागिने, टीव्ही, कारची चावी असा एकूण 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी पाच वाजता दक्षतानगर, वाकड येथे उघडकीस आली.

विजय शिवाजी जगदाळे (वय 36, रा. दक्षतानगर, वाकड) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 19) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदाळे 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत गावी गेले होते. त्या कालावधीत त्यांचे घर बंद होते. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जगदाळे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने, टीव्ही, कारची चावी असा एकूण 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. जगदाळे बुधवारी दुपारी गावाहून परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.