Wakad Crime : दुचाकीवरून जाणा-या महिलेच्या गळ्यातून पाऊण लाखाचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 78 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 26) रात्री साडेआठ वाजता ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी येथे घडली.

शोभा मनोहर डोबे (वय 50, रा. काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसनी दुचाकीवरील दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी आणि त्यांचे पती मोपेड दुचाकीवरून ज्योतिबा गार्डन जवळून जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 26 ग्रॅम वजनाचे सुमारे 78 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.